#SameerWankhede : नवाब मलिक यांचे आरोप सत्य- जयंत पाटील
X
NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप करत आहेत. पण मलिक यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका आतापर्यंत स्पष्ट केली नव्हती, पण आता नवाब मलिक हे पुराव्यांच्या आधारे आरोप करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांच्या पाठिशी असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक हे NCBच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत आहे. नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी NCB चा वापर होतोय असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. दापोली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे. समीर वानखेडे यांनी जातीचा खोटा दाखला दाखवून कशाप्रकारे नोकरी मिळवली याचा खुलासा लवकरच होईल असेही पाटील यांनी म्हटले आहे. नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.