Home > Politics > भाजपकडून त्यांच्याच नेतृत्वाच्या आदेशाला केराची टोपली ; नवाब मलिक यांची रेलेभरो आंदोलनावर प्रतिक्रिया

भाजपकडून त्यांच्याच नेतृत्वाच्या आदेशाला केराची टोपली ; नवाब मलिक यांची रेलेभरो आंदोलनावर प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपच्या रेलभरो आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार टीका केली आहे

भाजपकडून त्यांच्याच नेतृत्वाच्या आदेशाला केराची टोपली ; नवाब मलिक यांची रेलेभरो आंदोलनावर प्रतिक्रिया
X

मुंबई // कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत मुंबईमध्ये रेल भरो आंदोलन केलं आहे. याबाबत बोलतांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी करू नका असं म्हणत आहेत तर त्यांच्याच पक्षाचे राज्यातील नेते आंदोलन करत आहेत, म्हणजे ते त्यांच्या नेतृत्वाच्या आदेशाचे पालन करत नाहीत हेच यावरून दिसत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मुंबई लोकल सेवेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजपने हाच मुद्दा घेत राज्य सरकार विरोधात रेल भरो आंदोलन केलं आहे. मुंबईत सामान्य नागरिकांना लोकसेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. हीच मागणी घेऊन भाजपने मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन केले. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनमध्ये आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान याबाबत बोलतांना मलिक यांनी म्हटलं आहे की, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. मात्र, कोरोना पार्दुभाव लक्षात घेता सर्व सामान्य मुंबईकरांना लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात लसीकरण आणि कोरोना रूग्णांची संख्या याबाबत आढावा घेऊन सेवा सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. मात्र, भाजपचे हे आंदोलन म्हणजे त्यांच्याच नेतृत्वाच्या आदेशाची पायमल्ली केल्यासारखे असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

Updated : 6 Aug 2021 12:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top