Home > Max Political > नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर अवैध फोन टॅपिंगचा गंभीर आरोप

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर अवैध फोन टॅपिंगचा गंभीर आरोप

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर अवैध फोन टॅपिंगचा गंभीर आरोप
X

आर्यन खान प्रकरणात NCB च्या तपास अधिकाऱ्यावर तोफ डागणाऱ्या नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझी कन्या निलोफर मलिक हिचे कॉल डिटेल्स मागितले होते. असा आरोप केला आहे.

"माझ्यावर जे प्रश्न विचारत आहेत, त्यांना मला विचारायचं आहे. माझ्या जावयाला तुरुंगात बंद करण्यात आलेलं आहे. माझी मुलगी अनेक गोष्टींची चौकशी करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे की, तिचे सीडीआर उपलब्ध करून द्यावेत. निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर त्यांनी ही माहिती मागितली? मला वाटतंय की वानखेडे मर्यादा ओलांडत आहे. समीर वानखेडे दोन लोकांच्या मदतीने लोकांचे फोन टॅप करत आहेत. लोकांचे कॉल्स इंटरसेप्ट केले जात आहे. दोन खासगी लोक आहेत. एक व्यक्ती मुंबईत आहे, तर एक व्यक्ती ठाण्यात आहे. या दोन व्यक्तींची नावे आणि पत्ता माझ्याजवळ आहे. आता ही लढाई खूप लांबवर चालणार असून या गोष्टी येत्या काळात समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी आपण "मी कुणाचाही धर्म काढत नाही. माझा लढा हा एका मागासवर्गीयाचा अधिकार हिरावून बोगस कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्याच्या विरोधात आहे. या प्रकरणामध्ये समीर वानखेडेंचे वडील सांगत आहेत. की मी कधी धर्मपरिवर्तन केले नाही. मग खरे जन्म प्रमाणपत्र तुम्ही आणा आणि सांगा मी दिलेले प्रमाणपत्र खोटे आहे. माझ्याकडे बरीच कागदपत्रे आहेत. माझ्याकडे असे पुरावे आहेत जे ते कधीही नाकारू शकत नाहीत," असा दावा देखील मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

Updated : 26 Oct 2021 6:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top