MNS leader's resign : नवी मुंबईत मनसेला हादरा
मनसेच्या वर्धापन दिनाला दोन दिवसही उलटले नाहीत. तोच नवी मुंबईत मनसेला मोठा हादरा बसला आहे.
X
दोनच दिवसापुर्वी मनसेचा वर्धापन दिन झाला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे (MNS) पुन्हा जोरदार मुसंडी मारेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र या घटनेला दोन दिवसही पूर्ण झाले नाहीत. तोच नवी मुंबईतील मनसेच्या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
यामध्ये नवी मुंबईचे उप शहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे (Prasad Ghorpade) यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. यावेळी प्रसाद घोरपडे यांनी मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan kale) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी प्रसाद घोरपडे म्हणाले, नवी मुंबई शहराध्यक्ष तथा प्रवक्ता असलेल्या गजानन काळे यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे काम करण्यात अडचणी येत आहेत. त्यांचे महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे अधिकारी आमच्या पत्रांना उत्तरं देत नाहीत. वरिष्ठांना वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेत नसल्याने प्रसाद घोरपडे यांच्यासह मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई मनसेतील वाद चव्हाट्यावर आल्याने त्याचा आगामी काळातील निवडणूकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.