राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू; पण नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?
ED ने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. तर सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. मात्र गांधी परिवाराला अडचणीत आणणारे नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...
X
काँग्रेसचे सर्वोच्च नेते असलेल्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ED ने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर राहुल गांधी चौकशीसाठी हजर झाले आहेत. मात्र सलग तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांची ED कडून चौकशी सुरू आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald case) काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ED ने नोटीस बजावल्यानंतर 13 जून रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे आजही राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
राहुल गांधी यांची चौकशी सुरू असताना देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केले. तसेच मोदी सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणात ED कडून राहुल गांधी यांना अडचणीचे प्रश्न केले जाण्याची शक्यता आहे.
नॅशनल हेराल्ड काय आहे? (What is National Herald)
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वर्तमानपत्र हे महत्वाची भुमिका बजावतात. हे जाणून पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Neharu) यांनी ९ सप्टेंबर 1938 मध्ये नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची स्थापना केली. मात्र 1942 मध्ये या वर्तमानपत्रावर ब्रिटीशांनी बंदी घातली. त्यानंतर 1945 आणि 1946 मध्ये नॅशनल हेराल्ड पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर 1946 ते 1950 दरम्यान फिरोज गांधी (Firoz Gandhi) हे नॅशनल हेराल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. मात्र पंडित नेहरू हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी नॅशनल हेराल्डच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. पण त्यानंतरही नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्रावर काँग्रेसची पकड कायम होती. तर नॅशनल हेराल्डसंबंधी बोलताना पंडित नेहरू म्हणाले होते की, नॅशनल हेराल्ड हे काँग्रेसच्या धोरणांचा पुरस्कार करणारे वर्तमानपत्र असले तरी त्याचा स्वतंत्र दृष्टीकोण आहे, असं मत व्यक्त केले होते.
मात्र 1 एप्रिल 2008 मध्ये आर्थिक अडचण निर्माण झाल्याने नॅशनल हेराल्ड हे वर्तमान पत्र बंद पडले. मात्र मार्च 2016 मध्ये असोसिएट जर्नलने या वर्तमानपत्राची डिजिटल आवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली.
नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? (What is National Herald Case)
पंडित नेहरु यांनी सुरू केलेले नॅशनल हेराल्ड 2008 मध्ये बंद पडले. त्यानंतर मार्च 2016 मध्ये असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीने नॅशनल हेराल्डची डिजिटल आवृत्ती सुरू केली. मात्र त्यावेळी नॅशनल हेराल्ड कंपनीची मुळ कंपनी असलेल्या असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीची मालमत्ता 2 हजार कोटींच्या आसपास होती. मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या यंग इंडिया कंपनीने ही मालमत्ता अवघ्या 50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. (BJP Leader Subramaniam swami allegation on young indian company owned by Congress leader soniya Gandhi And Rahul Gandhi)
तसेच 2008 मध्ये हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर काँग्रेसने एजीएल (Associate Journal Ltd) कंपनीला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले होते. मात्र 2010 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 'यंग इंडियन' नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के भागीदारी आहे तर उर्वरित हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता. मात्र असोसिएटेड जर्नल लिमिटेडला काँग्रेसने दिलेल्या 90 कोटी रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात या कंपनीची 99 टक्के भागीदारी यंग इंडियन कंपनीला मिळाली असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
तसेच AJL कंपनीची मालमत्ता ही 2000 कोटी रुपयांची होती. मात्र काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एजीएल ही कंपनी हस्तगत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचा निधी वापरल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्यामुळे त्याच प्रकरणात सध्या ED कडून राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे.
ED च्या चौकशीवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल (Congress allegation on Modi government) राहुल गांधी हे देशाच्या नागरिकांचे प्रश्न मोदी सरकारला विचारतात. त्यामुळे मोदी सरकारकडून राहुल गांधी यांना लक्ष केले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू; पण नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?राहुल गांधी यांची ED कडून जी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काँग्रेसकडून व्हिक्टीम कार्ड खेळलं जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.