Home > Politics > Narayan Rane यांना मोठा दिलासा, उध्दव ठाकरे अवमान प्रकरणात राणे दोषमुक्त

Narayan Rane यांना मोठा दिलासा, उध्दव ठाकरे अवमान प्रकरणात राणे दोषमुक्त

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी कोर्टाने राणेंना मोठा दिलासा दिला आहे.

Narayan Rane यांना मोठा दिलासा, उध्दव ठाकरे अवमान प्रकरणात राणे दोषमुक्त
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा (Amritmahotsav Independence Day) उल्लेख हिरक महोत्सवी स्वातंत्र्यदिन असा केला होता. त्यावरून नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच राणे यांना या प्रकरणी अटकही करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आता न्यायालयाने नारायण राणे यांना दोषमुक्त केले आहे.

हे ही वाचा : Threat to Sanjay raut : संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अलिबाग (Alibaug) मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. केंद्रीय मंत्री राणे यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान महाड (Mahad) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात राणे यांचे अटकनाट्य रंगले होते. त्यांचे वकील Adv. सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी गुन्हा शिक्षा करण्याइतका गंभीर नसल्याने तसेच पुरेसा पुरावा दोषारोपपत्रात दिसत नसल्याने राणे यांना दोषमुक्त करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला केली होती. ती न्यायालयाने मान्य केल्याने नारायण राणे यांना दोषमुक्त करण्यात आले.


Updated : 2 April 2023 5:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top