Home > Politics > मुंबई महाराष्ट्राचीच , नाही कोणाच्या बापाची - देवेंद्र फडणवीस

मुंबई महाराष्ट्राचीच , नाही कोणाच्या बापाची - देवेंद्र फडणवीस

मुंबई महाराष्ट्राचीच , नाही कोणाच्या बापाची - देवेंद्र फडणवीस
X

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक झाली त्या बैठकीत ठरल्यानुसार आपण वागत आहोत पण कर्नाटकचे मंत्री जर वादग्रस्त विधाने करीत असतील ती खपवून घेणार नाही. ते मुंबईवर हक्क मागत असतील तर मुंबई महाराष्ट्राचीच, नाही कोणाच्या बापाची असे ठणकावून सांगत कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधाचे पत्र महाराष्ट्र सरकार पाठविणार असे उपमुख्यमंत्र्या देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

कर्नाटकचे मंत्री, आमदार सातत्यानं महाराष्ट्रविरोधी गरळ ओकण्याचं काम सुरु असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे उपस्थित केला. "मुंबईमध्ये वीस टक्के कन्नड भााषिक राहतात. मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई केंद्रशासित करा," अशा प्रकारची वादग्रस्त करुन कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याचे सांगत अजित पवार यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्य सरकारने महाराष्ट्रवासियांच्या संतप्त भावना आणि तीव्र नाराजी कर्नाटक सरकारला कळवाव्यात. केंद्रीय गृहमंत्र्यांनाही कर्नाटकला समज देण्यास भाग पाडावे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तेथील मराठी भाषिकांवर अन्याय करीत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याची बैठक झाली. त्यामध्ये न्यायालयीन बाब असताना दोन्ही राज्याकडुन वादग्रस्त विधाने करण्यात येवू नयेत असे ठरले असताना दोन्ही राज्याकडून सलोख्याचे संबंध कायम ठेवावेत असे सांगितले असताना कर्नाटकचे कायदा मंत्री जे सी मधुस्वामी यांनी मुंबईत २० टक्के कानडी भाषिक लोक राहतात असे सांगत मुंबई केंद्रशाशित करावी अशी मागणी विधानसभेत केली. कर्नाटकाकडून सातत्याने महाराष्ट्राला डिवचन्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना पुन्हा एकदा ठणकावून सांगा तसे निषेधाचे पत्र पाठवून ही बाब केंद्र सरकारला तातडीने कळवा असा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडली.

मुंबईमध्ये कन्नडभाषिकंच नव्हे तर विविध प्रांतातून आलेले नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नाला विनाकारण वेगळं रुप देण्याचा प्रयत्न करत आहे. "मुंबईमध्ये वीस टक्के कन्नड भााषिक राहतात. मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई केंद्रशासित करा," अशी प्रकारची त्यांची वक्तव्ये सहन करता येणार नाहीत. मी त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करतो. महाराष्ट्र सरकारनेही कर्नाटक सरकारला तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या तीव्र भावना कळवाव्यात. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटक सरकारला समज देण्याबाबत कळवण्यात यावे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगत मुंबई महाराष्ट्राचीच नाही कुणाच्या बापाची असे सांगितले.कर्नाटकच्या कायदा मंत्र्यांनी केलेले दावे हे विसंगत आहेत...त्याचा मी निषेध करतो. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेठकीत ठरल्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या निर्देशांचे आपण पालन करतो. पण त्यांच्याकडून पालन होत नाही, तेव्हा त्यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधाचे पत्र आपण या सभागृहा मार्फतच पाठवू असे विधानसभेत सांगितले.

Updated : 28 Dec 2022 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top