उदयनराजे भोसले भाजप खासदारकीचा राजीनामा देणार ?
X
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे यांनी टीका केलीय होती.राज्यपालांना दिल्लीत परत पाठवा तसेच त्रिवेदी यांनी माफी मागावी अशी मागणी खासदार भोसले यांनी केली होती.
उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत भावुक झाले डोळ्यात अश्रूही अनावर झाले होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज विषयी वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना पदमुक्त केले नाही तर खासदारकीची राजीनामा देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर उदयनराजे यांनी सांगितले की त्यावेळी काय होईल आताच सांगता येणार नाही, त्यावेळी निर्णय घेईल, मी कुठलाही निर्णय बदलत नाही.कुठल्याही राजकारणासाठी मी फारकत घेत नाही अस वक्तव्य उदयनराजे यांनी केल्याने भाजपच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीमना देणार का यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
तीन डिसेंबर ला रायगडावर जाऊन धरणे आंदोलन करणार आहे तसेच लोकांना काय भावना आहेत त्या मांडणार आहे असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केलंय.एकंदरीत भाजपला राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्या च्या वादग्रस्त विधानावर तीन डिसेंबरचा अलटीमेट उदयनराजे यांनी दिलंय.