राजकारणात हेरगिरी करणं हे काय नवीन नाही
X
मुंबई// राजकारणात हेरगिरी करणं हे काय नवीन नाही,याबाबत संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हिंदुस्तानात अशा घटना आता वारंवार होत आहेत हे कोण करत आहे? विरोधकांची भीती नेमकी कोणाला वाटते आहे? याचा खोलवर तपास करणे गरजेचे आहे अस मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सांगलीत जो पूर आला होता , त्याच्यापेक्षा यावेळी लवकर मदत
दरम्यान यावेळी बोलताना खा. राऊत यांनी गेल्यावेळी सांगलीत जो पूर आला होता , त्याच्यापेक्षा यावेळी लवकर मदत मिळाली आहे असं म्हणाले आहेत. पूरग्रस्तांना वेळेत मदत मिळाली नाही या प्रश्नाला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की पूरग्रस्तांना मदत मिळते की नाही यावर स्वतः मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे.
कोकणातील पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री स्वतः फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत असं खासदार राऊत यांनी म्हंटले आहे.