Home > Politics > … तर मराठी माणूस अशा लोकांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.

… तर मराठी माणूस अशा लोकांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. … तर मराठी माणूस अशा लोकांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत राऊतांनी राणेंवर निशाणा साधला

… तर मराठी माणूस अशा लोकांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.
X

मुंबई : वेळप्रसंगी शिवसेना भवन देखील फोडू, असं वक्तव्य केल्याने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.

यावर बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर 'आमचे शाखाप्रमुख बोलतील', असं म्हणत प्रसाद लाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. लाड यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आ.लाड यांचा निषेध होत असताना त्यांच्यावर टीका होत असताना आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रसाद लाड यांना महत्त्व न देता त्यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान भाजप आमदार लाड यांनी आपण शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आदर करतो, माझ्या वक्तव्याचा मीडियाने विपर्हास केला असल्याचे म्हटलं आहे.

नितेश राणे यांना राऊतांचा सणसणीत टोला

दरम्यान काल भाजपचे नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांची मिमिक्री करत टीका केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत नितेश राणेंवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..)



खासदार संजय राऊत यांनी लाड आणि नितेश राणे यांच्यावर आज बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated : 1 Aug 2021 12:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top