Home > Max Political > कॉंग्रेस नसती तर... पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल

कॉंग्रेस नसती तर... पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल

कॉंग्रेस नसती तर... पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल
X

कॉंग्रेसमुळे दशाचं मोठं नुकसान झालं आहे. कॉंग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. कॉंग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी प्रखर टीका नरेंद्र मोदी यांनी आजा पुन्हा राज्यसभेत कॉंग्रेसवर केली.

कॉंग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. कॉंग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. कॉंग्रेसमुळे दशाचं मोठं नुकसान झालं आहे. कॉंग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. कॉंग्रेस नतती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी यावेळी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली. कॉंग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, देशात कॉंग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता. सरकार अस्थिर करणं हेच कॉंग्रेसचं काम आहे असं त्यांनी विविध उदाहणं देऊन केली.

काँग्रेसचे नाव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस बदलून फेडरेशन ऑफ काँग्रेस करा असाही सल्ला त्यांनी दिला. ``काँग्रेसचा विचार अर्बन नक्सल ने व्यापला आहे.सरदार वल्लभाई पटेल यांची हैदराबाद जुनागड ची रणनिती वापरली असतील तर गोव्याला पंधरा वर्ष स्वातंत्र्याची वाट पाहावी लागली नसती असंही मोदींनी सांगितलं. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी डर्टी ट्रीक्स वापर काँग्रेसने केला होता,`` असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

काँग्रेसने सत्तेत असताना देशाचा विकास होऊ दिला नाही.आता विरोधात असताना भाजपाला देशाचा विकास करू दिला जात नाही.1975 मध्ये आणिबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटणारी यांना लोकशाहीचा उदोउदो करण्याचा अधिकार नाही असं मोदी म्हणाले.

परिवारीवादी पार्ट्यां कडूनच भारतीय लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. महात्मा गांधीनी काँग्रेस संपवण्याची सूचना केली होती.महात्मा गांधींची सूचना अमलात आणली असती तर लोकशाही परिवार मुक्त असती असंही ते म्हणाले.

शरद पवार आजारी असूनही या वयात आपल्या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देतात. विरोधकांचे डोळे मात्र अंध झाले आहेत, असं मोदींनी सांगितलं. कोरोना काळात मी मुख्यमंत्र्यांसोबत 23 बैठका घेतल्या. कोरोना संकटात बहिष्कार टाकून विरोधकांनी राजकारण केले.बजेटच्या पूर्वीच राज्यांना 64 हजार कोटी दिले असंही मोदींनी सांगिंतलं.

Updated : 8 Feb 2022 2:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top