शिवाजी पार्कवर राज ठाकरे दसरा मेळावा घेणार?
पक्षातील फुटीमुळे बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरे यांचे आणखी एक टेन्शन वाढले आहे. आता राज ठाकरे यांनीच दसरा मेळावा घ्यावा असा पर्याय पुढे आणला गेला आहे...
X
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना पक्ष संघटनेवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर (dasara melava ) देखील आता शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे दसऱ्याला शिवाजी पार्कवर ( Shivaji Park ) दसरा मेळावा कोण घेणार याबाबत चर्चा सुरू असताना आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena ) उडी घेतली आहे. मनसेचे (MNS ) नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande ) यांनी मनसैनिकांचे भावना व्यक्त करणारे पत्रच प्रसिद्ध केले आहे. त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे.
राज ठाकरे यांना लिहिलेल्या या पत्रात नेमके काय म्हटले आहे ते पाहूया....
"वंदनीय हिंदुदसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ 'एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष भो हा चमत्या अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच आपल्या शिवतीर्गावर दसऱ्याच्या दिवशी मराठीजनांच्या रोगाच्या रोगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुदसम्राटाकडून मिळालेले राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माच 'बाळकडू विचारांचं सोनं घेऊन घरी परतत.
महाराष्ट्र सैनिकांचे मनोगत pic.twitter.com/4zUv4uuTwL
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 2, 2022
दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुहृदयसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी के. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धमनेरपेक्षतावादी राजकीय पक्षावर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही धर्मद्रोही पक्षांशी पाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासपात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बर इतके सगळं करूनही स्वतःचा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच
एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल असत. पण आता 'के, बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार अस म्हणत 'यू टर्न' आणि 'बंडखोर असे दोन्ही गट शिक्तीवर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनासमोर हिंदुत्वाच अग्निकुड ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?
वंदनीय के, बाळासाहेब ठाकरे आणि शिव सेना या चार अक्षरावर प्रेम करणारा त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेच आहे. हिंदूची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे म्हणून कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदी रक्षकाची, महाराष्ट्र आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दरायता आपण वंदनीय हिंदुदसम्राट के बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन
सल्यानिमित्त शिववर आपल्या परखड, रोखठोक ठाकरी शैलीतील वक्तृत्वाच्या तेजः पुज आविष्काराची "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनी आणि मातांनो याची महाराष्ट्र आणि या हिंदुस्थान आतुरतेने वाट पहात आहेत. धन्यवाद"
दसरा मेळावा राज ठाकरे घेणार का अशी चर्चा आता यामुळे सुरू झाली आहे.