Home > Politics > ...म्हणून तर आगरी, कोळी बांधवांना मुंबईतून विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू नाही ना ? - देशपांडे

...म्हणून तर आगरी, कोळी बांधवांना मुंबईतून विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू नाही ना ? - देशपांडे

...म्हणून तर आगरी, कोळी बांधवांना मुंबईतून विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू नाही ना ? - देशपांडे
X

मुंबई : आगरी , कोळी बांधवांना मुंबईतून विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत, अनेक ठिकाणचे मासळी बाजार बंद केले जात आहेत असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, "खरे तर आगरी, कोळी बांधव हे मुंबई चे मूळ रहिवाशी. त्यांनाच सध्या विस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेक ठिकाणचे मासळी बाजार बंद केले जात आहेत कोळीवाडे उध्वस्त केले जात आहेत. विमान तळाला दि.बा. पाटील साहेबांच्या नावाचा आग्रह हे तर कारण नाही ना??" असं त्यांनी म्हटले आहे.

मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी ही मागणी लावून धरत अनेक आंदोलन केली आहे. यामुळेच आगरी , कोळी बांधवांना मुंबईतून विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा , तिकडे बंजारा समाजाने या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं देण्याचा आग्रह धरला आहे. यामुद्द्यावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान मुंबईतील अनेक ठिकाणचे मासळी बाजार बंद केले जात असल्याने विमानतळ नावाच्या मुद्यांवरून आगरी , कोळी बांधवांना मुंबईतून विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 23 Aug 2021 10:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top