Home > Politics > आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेची खोचक टीका

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेची खोचक टीका

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेची खोचक टीका
X

शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानिमीत्ताने शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या दौऱ्यावर मनसेने खोचक टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे आणि राज ठाकरे यांच्यावर शस्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांनी हा दौरा स्थगित केला. मात्र राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलेला दौरा बुधवारी होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र या दौऱ्यावर मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक प्रतिक्रीया दिली आहे.

गजानन काळे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदूत्वावरून असली हिंदूत्वाकडे प्रवास सुरु व्हावा. तसेच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर होवो, मशिदीवरील भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो, असा टोला लगावला आहे. तसेच पुढे गजानन काळे यांनी असे म्हटले आहे की, विधानपरिषद निवडणूकीत MIM व सपाची मदत न घेण्याची सुबुध्दी येवो, असा टोलाही काळे यांनी लगावला आहे.

Updated : 14 Jun 2022 11:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top