Home > Politics > ठाकरे गटाच्या आमदाराने नावात जोडलं उध्दव बाळासाहेब ठाकरे

ठाकरे गटाच्या आमदाराने नावात जोडलं उध्दव बाळासाहेब ठाकरे

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना (Shivsena) आणि पक्षचिन्हाबाबत अखेर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत (MLA Udaysingh Rajput) यांनी आपल्या नावात उध्दव बाळासाहेब ठाकरे जोडले आहे.

ठाकरे गटाच्या आमदाराने नावात जोडलं उध्दव बाळासाहेब ठाकरे
X

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हाती सोपवल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (supreme Court) धाव घेतली आहे. दुसरीकडे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आक्रमक होत रस्त्यावर उतरला आहे. त्यापार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत म्हणाले की, माझे नाव उदयसिंह चित्रासरदारसिंह राजपूत असले तरी माझे राजकीय नाव उदयसिंह उध्दव बाळासाहेब ठाकरे आहे. त्यामुळे मी व्हीपसंदर्भात उध्दव ठाकरे यांचाच आदेश पाळणार आहे.

मी आधी मागे बसायचो. कारण मला वाटायचं की समोरचे निष्ठावंत असतील. पण ते तर ड्युप्लिकेट निघाले. त्यामुळे मी आज निष्ठावंत म्हणून समोर बसलो आहे. कारण निष्ठावान हे कपाळावर लिहीलेलं नसतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे पहिल्या दिवशी बाजूला बसणारे दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला दिसले. आता खरे निष्ठावंत शिल्लक आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांची क्रेझ खूप वाढलेली आहे. म्हणूनच जो उठतो तो उध्दव ठाकरे यांना टार्गेट करत असल्याची टीका उदयसिंह राजपूत यांनी केली.

Updated : 21 Feb 2023 10:20 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top