Home > Politics > प्रवीण दरेकरांनी आमदारकीसाठी फर्जिवडा केला: नवाब मलिकांचा विधानपरीषदेत आरोप

प्रवीण दरेकरांनी आमदारकीसाठी फर्जिवडा केला: नवाब मलिकांचा विधानपरीषदेत आरोप

मजूर असल्याचे सांगत आमदार म्हणुन निवडून आलेले विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना मोठा फर्जिवाडा केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरीषदेत केला.

प्रवीण दरेकरांनी आमदारकीसाठी फर्जिवडा केला: नवाब मलिकांचा विधानपरीषदेत आरोप
X

आमदार म्हणुन निवडून येताना शपथेवर माहीती द्यावी लागते. एकादा सदस्य शपथेवर खोटं बोलून निवडून आला असेल तर काय करायचे? प्रत्येक निवडणुकीमधे त्यांनी वारेमाप उत्पन्न दाखवलं आहे. मजूरांना काम करणाऱ्यांसाठी कायदा केला. त्यांना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून आरक्षीत प्रवर्ग केला. शपथपत्रावर खोटं बोलणाऱ्या प्रविण दरेंकरांवर कारवाईची मागणी मलिकांनी केली.

खोटं सांगून आमदार होणाऱ्या दरेकरांवर आम्ही विश्वास का ठेवावा असं मलिक म्हणाले. त्यावर स्पष्टीकरण देताना दरेकर म्हणाले, राज्यात शेतकरी नाही तो शेतकरी झाला. मजूर नाही तो मजूर झाला. कामगार नाही तो कामगार झाला. माथाडी नाही तो माथाडी झाला. यावर एक चर्चा घ्या असं ते म्हणाले.

सभापती रामराजे निंबाळकर यांनी सहकार विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या चौकशीला दरेंकरांनी वेळ मागवून घेतल्याचे सांगितले.

Updated : 22 Dec 2021 3:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top