Home > Politics > अनिल परबांचा सोमय्यांना इशारा, "बुध्दिबळात कोण कसा डाव खेळतं हे डावाच्या अंती कळत"

अनिल परबांचा सोमय्यांना इशारा, "बुध्दिबळात कोण कसा डाव खेळतं हे डावाच्या अंती कळत"

अनिल परबांचा सोमय्यांना इशारा,  बुध्दिबळात कोण कसा डाव खेळतं हे डावाच्या अंती कळत
X

"बुध्दिबळात कोण कसा डाव खेळतं हे डावाच्या अंती कळतं, त्यामुळे यावर आता बोलणे योग्य राहणार नाही, पुढे लढाईत काय होते ते बघूया" असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांनी दिला आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचा मुहुर्त साधत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पुण्यातून पहिली इलेक्ट्रिक बस " शिवाई" नावाने सोडली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होचे. या महिन्याच्या अखेरीस १५० बसेस पहिल्या टप्प्यात सरकारी योजनेतुन येतील आणि यानंतर साधारण ३ हजार बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना "आजपर्यंत मी किरीट सोमय्याला उत्तर द्यायला बांधील नाही त्यामुळे आपण कुठलेही उत्तर दिलेले नाही. त्यांना एजन्सीकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे. पण अधिकारी आम्हाला जे प्रश्न विचारतात त्यांची उत्तरे आम्ही देत आहोत" असे त्यांनी सांगितले. जे काही आरोप असतील ते त्यांनी यंत्रणेकडे करावे, यंत्रणेने आमची चौकशी करावी आणि त्याच्यातुन सत्य बाहेर येईल, असे परब यांनी स्पष्ट केले आहे.


Updated : 1 Jun 2022 1:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top