Home > Politics > MIMचे इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे केले कौतुक

MIMचे इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे केले कौतुक

MIMचे इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे केले कौतुक
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच केलेल्या जाहीर भाषणात अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भाषणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्र्यांनी खुल्या मनाने केलेल्या भाषणाचे कौतुक केले आहे. MIMचे खासदार इम्तिय़ाज जलील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले आहे?

"ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवण्यात आली. २०१४ एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने दिले, हे लक्षात ठेवा" असे त्यांनी हटले आहे. "माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा" असे आवाहन त्यांनी केले. " आयुष्याची कमाई पद नाही" असे सांगत त्यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केले.

त्यांच्या या भाषणावर इम्तियाज जलील यांनी ट्विट केले आहे. @CMOMaharashtra

च्या सत्यतेचे कौतुक करा. @ShivSena सोबत आमचे राजकीय मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरे हे ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आहे. तुमच्या नम्रतेने सर्व विरोधकांना जोरदार चपराक दिली.

@AUThackeray

या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. राज्यसभा निवडणुकीतही एमआयएमने भाजपविरोधात महाविकास आघाडीला मतदान केले होते.

Updated : 22 Jun 2022 7:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top