राज्यपाल व चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचा मास्टर प्लॅन...
X
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची हाकालपट्टी करण्याचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये घेण्यात आला आहे..
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा अवमान करणारे राराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा ठराव जालना येथील मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत घेण्यात आला आहे. राज्यपालांचा संभाजीनगर व नागपूर येथे दौरा आहे. ज्या दिवशी राज्यपाल संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी येणार आहेत त्या दिवशी कडकडीत बंद ही पाळण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेत विविध विषयांवर विविध ठराव देखील मंजूर करण्यात आले. या परिषदेत आरक्षण समितीच्या उपसमिती वरून मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची हकालपट्टी करण्यात यावी असा देखील ठराव करण्यात आला आहे. या ठरावासह अन्य 15 ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले आहेत.