केतकी चितळेने पुन्हा शरद पवार यांना डिवचले..
X
केतकी चितळे हे नाव आता सर्वांना परिचयाचे झाला आहे. ( Marathi actor Ketaki Chitale) मागच्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात याच नावाने मोठा गदारोळ केला होता. या सगळ्या गदारोळाचं कारण ठरलं होतं तिने समाजमाध्यमांवर केलेली एक पोस्ट. काही दिवसांपूर्वी केतकीने (Ketaki Chitale) समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली होती, त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विषयी आक्षेपार्य मजकूर प्रसिद्ध केला म्हणून तिच्यावरती गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणात केतकीला जेलची वारी देखील करावी लागली होती.
केतकी चितळे यांच्या विरोधात कळवा पोलिसात (kalwa police station) गुन्हा दाखल झाला होता व त्यानंतर तिला अटकही केले गेले. सध्या त्या जामीनावर बाहेर आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने तिच्या विरोधात जे काही गुन्हे दाखल केले आहेत ते सगळे एकत्रित करण्याची व ते रद्द करण्याची मागणी केली. इतकच नाही तर तिने नुकसान भरपाईची सुद्धा मागणी केली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्य मजकूर प्रसिद्ध केला म्हणून तिच्या विरोधात महाराष्ट्रभरातून जवळपास 22 गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आता याच सगळ्या प्रकरणाबाबत केतकीने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात (high court ) धाव घेतली आहे. शरद पवार यांच्याबाबत समाज माध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी तिने केली आहे. माझ्या विरोधात जे काही गुन्हे दाखल झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP) केलेल्या तक्रारीवरून दाखल झाले आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांनी आपल्या विरोधात तक्रार केलेली नाही. त्यामुळे पवार यांनी कोणतीही तक्रार केलेली नसताना आपल्या विरोधात गुन्हा दाखल करणे योग्य आहे का? असा प्रश्न केतकी चितळे यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केला आहे. त्याचबरोबर तिने या प्रश्नाची पडताळणी करण्यासाठी शरद पवार यांनी प्रतिवाद करावा अशी मागणी देखील केली आहे..