राज्यात भाजप सरकार येणार का? चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यातील सरकार कोसळणार की टिकणार अशी चर्चा सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यात स्थिर सरकार देण्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
X
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप राज्यात सत्ता स्थापन करण्याची चर्चा सुरू झाली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर राज्याला स्थिर सरकार देण्याबाबत भाजपची भूमिका काय? याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्याने सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही गोष्ट मला तुमच्याकडूनच समजत आहे. तर यामध्ये भाजपची कोणतीही भूमिका नाही. भाजपचे नेते आपली दररोजची कामं करत आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या दिल्ली वाऱ्यांच्या पार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा स्पीड जास्त आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा वरिष्ठांच्या भेटीची वेळ मिळते. त्यावेळी ते रात्री अपरात्री भेटीसाठी रवाना होतात, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.
तसंच आसामचे मंत्री शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलची व्यवस्था करत असल्याचे माध्यमांमध्ये दिसत आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्याबाबत मला काही माहिती नाही. मला ही गोष्ट तुमच्याकडूनच समजत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.