महाराष्ट्रातील ४० साखर कारखाने ईडीच्या रडारवर ?
X
ई़डी म्हणजेच सक्तवसुली संचलयाने महाराष्ट्रात जोरदार कारवाई सुरु केली जात असताना आता जरांडेश्वर आणि कन्नड सहकारी साखर कारखान्यानंतर राज्यात नियम डावलून कर्ज दिल्या प्रकरणी ४० साखर कारखान्यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
ईडीच्या रडारवर महाराष्ट्रातील ४० साखर कारखाने नियम डावलून कर्ज दिल्या प्रकरणी साखर कारखान्यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव बैंक (Maharashtra State Co-operative Bank -MSCB) घोटाळा २५ हजार कोटींचा आहे. त्यातील एका साखर कारखान्याला ईडी ने सील केलं आहे. त्याच बरोबर मागील आठवड्याभरात ९ कारखाने ईडीच्या रडारवर होते परंतु आता एकूण ४० साखर कारखाने हे ईडीच्या रडारवर आहेत. अशी माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळत आहे. हे ४० कारखाने कोणत्या रेट मद्ये विकण्यात आले होते, साखर कारखाने नियम डावलून कर्ज दिले ? थक बाकी? मालमत्तेची तफावत असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. या प्रकरणी कार्यवायी आता ईडी ने सुरू केली आहे. अशी माहिती सुत्राकडून मिळत आहे.
केंद्रातील नवे सहकार मंत्रालय अमित शहा हे नवे केंद्रीय सहकार मंत्री आणि रिजर्व बॅंकेच्या माध्यमातून सहकार संस्थांवरील अतिरेकी बंधनांमुळे सहकार क्षेत्रात अस्वस्थता आहे.