जनतेचे चार कोटी पाण्यात जाण्यास आदित्य ठाकरे जबाबदार, मनसेचा गंभीर आरोप
X
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्यासह मनसे शिवसेनेविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच जनतेचे चार कोटी रुपये पाण्यात जाण्यास आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
शिवाजी पार्कमध्ये मुंबई महापालिकेने राबवलेला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पुर्णपणे फसला असून शिवाजी पार्क परिसरात चिखल झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुर्णपणे फसला असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तर यासाठी वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर आणि आदित्य ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.
मनसेच्या माध्यमातून केलेला प्रकल्प मोडीत काढून त्यावर चार कोटी रुपये महापालिकेने खर्च केला. मात्र त्यानंतरही शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झाला असल्याने जनतेचे पैसे पाण्यात गेल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.