Home > Politics > शिवसेनेतील बंडानंतर उध्दव ठाकरे यांचा मोठा निर्णय

शिवसेनेतील बंडानंतर उध्दव ठाकरे यांचा मोठा निर्णय

शिवसेनेतील बंडानंतर उध्दव ठाकरे यांचा मोठा निर्णय
X

एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्य सरकार टिकणार की कोसळणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र दुसरीकडे मंत्रीमंडळ बैठकीत सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच सरकारच्या स्थिरतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यातच उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबत मंत्रींमडळ बैठकीत प्रस्ताव दिला आहे. (Maharashtra Political Crisis take a big Decision )

मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे (Aurangabad) नाव बदलून संभाजीनगर (sambhajinagar) करण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. तर संभाजीनगर नाव करण्याबाबतच्या प्रस्तावावर बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेना, भाजप आणि मनसेनीही केली होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सोई सुविधा निर्माण केल्याशिवाय आणि एक आदर्श मॉडेल निर्माण केल्याशिवाय संभाजीनगर असं नामांतर करण्यात येणार नसल्याचे औरंगाबाद येथील सभेत म्हटले होते. मात्र सरकारच्या स्थिरतेविषयी प्रश्न निर्माण झाल्याने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याविषयीचा प्रस्ताव अनिल परब यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबतच्या प्रस्तावावर काँग्रेसची भुमिका विचारली असता मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत कुठलीची चर्चा झाली नाही. मात्र हा विषय चर्चेला आला तर त्यावर काँग्रेसच्या अजेंड्यानुसारच भूमिका घेण्यात येईल, असं अशोक चव्हाण मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर म्हणाले. (Congress stand on changing name of Aurangabad to sambhajinagar)


Updated : 28 Jun 2022 8:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top