सुप्रीम कोर्टातील सुनावणीतील १० महत्त्वाचे मुद्दे
X
१. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना तूर्तास दिलासा, अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती
२. उपाध्यक्षांसह ६ जणांना कोर्टाची नोटीस
३. अपात्रतेची नोटीस रद्द करण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवर तातडीने निर्णय़ नाही
४. एकनाथ शिंदे गटाला उपाध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार
५. राज्यात होत असलेल्या हिंसाचारामुळे हायकोर्टात याचिका दाखल केली नसल्याचा शिंदे गटाचा युक्तीवाद
६. बंडखोर आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि मालमत्तेची काळजी घेण्याच्या कोर्टाच्या सूचना
७. आपल्यावरील अविश्वास प्रस्तावाची नोटीस फेटाळण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे का, सुप्रीम कोर्टाची विचारणा
८. बंडखोर आमदारांनी नोंदणीकृत इ मेल आयडीवरुन अविश्वास ठरावाची नोटीस न पाठवल्याने ते फेटाळण्याचा उपाध्यक्षांचा निर्णय
९. विधिमंडळाच्या सचिवांनी इमेलच्या सत्यतेची पडताळणी केली का? कोर्टाची विचारणा
१०. उपाध्य़क्षांचे अधिकार हे न्यायकक्षेच्या बाहेर असल्याचे सिद्ध करुन दाखवण्याची कोर्टाची सेनेच्या वकिलांना सूचना