Home > Politics > 'गुहावटीतील योग शिबीर', एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची टीका

'गुहावटीतील योग शिबीर', एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची टीका

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला 'योग शिबीर' तर शिंदे यांना 'योगराज' असं म्हणत शिवसेनेने गुहावटीतील आमदारांवर टीका केली आहे. पण शिवसेनेनं नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेण्यासाठी वाचा...

गुहावटीतील योग शिबीर, एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची टीका
X

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड केल्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. तर उध्दव ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसैनिक आक्रमक झाला आहे. मात्र शिंदे यांचा गट सध्या गुहावटीत आहे. त्यावरून सामनाच्या अग्रलेखात बंडखोर शिंदे गटावर हल्ला चढवला आहे.

विधानपरिषद निवडणूकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले. त्यानंतर शिंदे यांचा गट आधी सुरत आणि आता गुहावटीत आहे. त्यापार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील सरकार कोसळणार की टिकणार? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसैनिक आक्रमक झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. हा शिंदे यांना मोठा धक्का आहे. मात्र शिंदे यांनीही कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेने सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्राचेच नव्हे तर संपुर्ण देशाचे लक्ष लागलेले कार्य पुर्ण होताना दिसत असल्याचा तिरकस टोला सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे या बंडखोर गटातील आमदारांना लगावला. या अग्रलेखात म्हटले आहे की, सुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले चिंतन शिबीर सध्या गुहावटी शहरात मार्गी लागले. पुढे असं म्हटलं आहे की, गुहावटीच्या रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये चाळीसेक आमदारांचे चिंतन शिबीर सुरू आहे. या चिंतन शिबीरात भाजप हा महाशक्ती असल्याचा ठराव संमत झाला, असा टोलाही अग्रलेखातून लगावला आहे.

आसामच्या योग शिबीरात चाळीसेक योगार्थी आहेत. ते कोण आणि कुठून आले ते संपुर्ण देशाला माहित आहे. कारण शिवसेनेचे चाळीसेक आमदार पळवून नेऊन त्यांचा चोख बंदोबस्त ठेवल्याने नव्या महाशक्तीचा साक्षात्कार झाल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे.

योग शिबीराच्या प्रमुखांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना सांगितले की, भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे आणि त्या महाशक्तीचा आपल्याला पाठींबा आहे. त्यामुळे आसाममधून अनेक दिव्य विचार महाराष्ट्रात येत असल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपला महाशक्ती असल्याचे म्हटले होते. त्याचा खरपूस समाचार घेतला.

Updated : 25 Jun 2022 8:53 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top