बंडखोर आमदाराची भाजपसोबत जाण्याची मागणी
X
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मोठी मागणी केली आहे. वाचा काय आहे महेश शिंदे यांची मागणी?
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी स्वपक्षाविरोधातच बंड केले आहे. त्यामुळे सरकार टिकणार की कोसळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाठ, यामिनी जाधव आणि आता महेश शिंदे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये महेश शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याची मागणी केली आहे.
महेश शिंदे यांनी व्हिडीओत म्हटले आहे की, वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक झाली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना किती निधी दिला? याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी चुकीची आकडेवारी दिली होती. मात्र आम्ही सत्य आकडेवारी दिल्यानंतर मुख्यमंत्रीही आचंबित झाले. त्यावेळी शिवसेना आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आमचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर महेश शिंदे म्हणाले की, शिवसेना आमदारांना 50 ते 55 कोटी निधी मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 700 ते 800 कोटी रुपयांचा आरोप केला होता. तसंच ज्या आमदारांना आम्ही पाडलं त्या आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा निधी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विकास कामांमुळे शिवसेनेचा उमेदवार पडू शकतो, ही भीती व्यक्त केली होती. मात्र त्याकडे उध्दव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना रोखठोक भुमिका घेण्याची मागणी केली. त्यामुळे तरी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचू शकेल, असं मत व्यक्त केलं. त्यामुळे ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आघाडी नको. तर नैसर्गिक पक्षासोबत युती हवी. हा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या अंतर्मनातील आवाज आहे, असं मत आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले.