Home > Politics > MVA Crisis : सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर..१४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार

MVA Crisis : सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर..१४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार

MVA Crisis : सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर..१४ फेब्रुवारीपासून  सलग सुनावणी होणार
X

गेल्या वर्षात निर्माण झालेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (MvaCrisis) पेच अजून मिटलेला नाही. सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल असं CJI डी. वाय चंद्रचूड यांनी आज सुप्रिम कोर्टात (SupremeCourt) स्पष्ट केलं.

ठाकरे गटाकडून मागणी केल्याप्रमाणे आज सत्तासंघर्षात काही निकाल येणार की फक्त घटना पीठ बदललं जाणार याची उत्सुकता होती. मात्र आज कुठलीही सुनावणी होणार नाही हे सुनावणी दरम्यान स्पष्ट झालं. आता ही सुनावणी आता १४ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरूद्ध शिंदे हा संघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. याआधीही अनेकदा तारीख पे तारीख चा अनुभव आला होता. त्यानंतर आज काहीतरी ठोस निर्णय दिला जाईल असं वाटलं होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या सत्तासंगर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सलग घेतली जाईल असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

१४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेतली जाणार आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे. त्यामुळे कोर्टाने दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य आहे. सात सदस्यीय घटनापीठ किंवा आत्ता असलेलं पाच सदस्यीय घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. १४ फेब्रुवारीचा दिवस हा व्हॅलेंटाईन डे चा दिवस आहे. त्यामुळे सगळं काही प्रेमाने होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज सुनावणी असल्याने खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब हे सुप्रीम कोर्टात पोहचले होते. सुनावणी महिनाभर लांबणीवर पडल्यानं शिंदे गटाला दिलासा तर ठाकरे गटाला धक्का बसला आहे.


Updated : 10 Jan 2023 12:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top