Home > Politics > राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक

राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक

राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला असताना राजकीय अनिश्चिततेच्या सावटामधे राज्यमंत्री मंडळाची तातडीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक
X

विधान परिषद निवडणुकीचा निराला लागल्यापासून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे.शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बंड पुकारलंय. एक दिवस सुरतमध्ये राहून आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या सेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं अशी प्रमुख मागणी बंडखोर शिवसेना नेत्यांची आहे.

राज्य सरकार अस्थिर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागील आठवड्यात शासन निर्णय जारी करण्यात आले होते. ठाकरे सरकारनेही बंडखोर मंत्र्यांच्या महिनाभरातील निर्णयाची समीक्षा करण्याचे ठरवले आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी देखील 21 22 आणि 23 जून रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत राजभवनला अवगत करावे असे आदेश दिले आहेत.

त्याबरोबरच सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेतला. त्यामुळे आता गुवाहटामधील बंडखोर मंत्री बिनखात्याचे मंत्री झाले आहे. त्यानंतर आज तातडीच्या बैठकीत नेमके कुठले निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे बंडखोर आमदारांनी वरील अपात्रतेची कारवाई 12 जुलै पर्यंत पुढे ढकलली असून आता महाराष्ट्रात सत्तापालट होणार? की राष्ट्रपती राजवट लागणार? अधिवेशनात विश्वास दर्शक ठराव मंजुरीसाठी येणार का ?पुन्हा निवडणुका होणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 28 Jun 2022 12:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top