Home > Politics > महाराष्ट्रातलं ऑपरेशन लोटस लांबणीवर...

महाराष्ट्रातलं ऑपरेशन लोटस लांबणीवर...

महाराष्ट्रातलं ऑपरेशन लोटस लांबणीवर...
X

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का, झालं तर कधी? विरोधी पक्ष दररोज नवनवीन डेडलाईन देत असतं, पण खरं ऑपरेशन नक्की कधी होणार आहे? कोण करणार आहे हे ऑपरेशन? कसं होईल हे ऑपरेशन.... भाजपच्या गोटात नक्की काय सुरूय. भाजपची नक्की रणनीती काय आहे.. हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीयो शेवटपर्यंत बघा.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अनेक वार केल्यानंतर ही हे सरकार डळमळलेलं नाही, यामुळे भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण रणनीती बदलली आहे. ऑपरेशन लोटस सध्या लांबणीवर टाकून भारतीय जनता पक्ष नवीन खेळी खेळण्यात गुंतली आहे. या ऑपरेशन चे सूत्रधार अर्थातच देवेंद्र फडणवीस असणार आहेत, मात्र सध्या परिस्थिती अनुकूल नसल्याने त्यांनी ही दोन पावलं माघार घेतली आहे.

सध्या उत्तर प्रदेश मधील निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात कुठलाच राजकीय बदल होणार नाही असं स्पष्ट झालंय. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यातील सत्ता बदलाला तयार नाहीत. जर सत्ता बदल करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे, आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कुठल्याही तडजोडी साठी तयार नाहीयत. उत्तर प्रदेश निवडणुकांनंतर शरद पवारांची राष्ट्रीय राजकारणाबाबतची रणनिती स्पष्ट होईल असं एकूण चित्र असल्याने सध्या तरी उत्तर प्रदेश निवडणुकांपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. शरद पवार हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वांत आक्रामक खेळी सध्या खेळत आहेत त्यामुळे त्यांना अशा वेळी दुखवायचं नाही, असा निर्णय भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घेतला आहे, त्यामुळे सध्यातरी ऑपरेशन लोटस लांबणीवर टाकण्यात आलेले आहे.


Updated : 23 Nov 2021 6:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top