Home > Politics > महाराष्ट्र अनलॅाकच्या दिशेने, पण मास्कमुक्ती नाही - मंत्री विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र अनलॅाकच्या दिशेने, पण मास्कमुक्ती नाही - मंत्री विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात मुंबईपासून कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली होती. आता परिस्थिती निवळत आहे आणि महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महाराष्ट्र अनलॅाकच्या दिशेने, पण मास्कमुक्ती नाही - मंत्री विजय वडेट्टीवार
X

कोरोनाचे निर्बंध शिथील होत असले तरीही मास्कमुक्ती मात्र होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मुंबईनंतर राज्यभर कोरोनाचे संक्रमण वाढले. पण सर्वप्रथम मुंबईतच रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. टप्याटप्याने राज्याच्या इतरही भागांत ही कार्यवाही करण्यात येणार आहेत, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले. या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पुर्णत: अनलॅाक होण्याची आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतेय. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. नागपूरात मात्र आठवडाभरासाठी निर्बंध तसेच राहणार आहेत. अनलॅाक होत असताना मास्कमुक्त महाराष्ट्र होणार नाही, प्रक्येकांनी मास्क घालणं गरजेचं आहे. अनलॅाकिंग करताना चौथ्या लाटेचीही चिंता आहे. चौथी लाट ओमीक्रॅानपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याची माहिती आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

विधिमंडळ समिती नागपुरात येऊन गेली. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्यावे की नाही, याबद्दल समितीचा निर्णय झालेला नाही. येत्या 15 तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Updated : 11 Feb 2022 8:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top