Home > Politics > फडणवीस पुन्हा आले; नवीन सरकारचा आजच होणार शपथविधी; राजभवनात जय्यत तयारी सुरू.

फडणवीस पुन्हा आले; नवीन सरकारचा आजच होणार शपथविधी; राजभवनात जय्यत तयारी सुरू.

'मी पुन्हा येईल', ही घोषणा वास्तवात आणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना सोबत घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे, फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी तर शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाचा प्रतिनिधी आजच पार पडणार आहे.

फडणवीस पुन्हा आले; नवीन सरकारचा आजच होणार शपथविधी; राजभवनात जय्यत तयारी सुरू.
X





'मी पुन्हा येईल', ही घोषणा वास्तवात आणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना सोबत घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे, फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी तर शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाचा प्रतिनिधी आजच पार पडणार आहे.

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले. शिंदे थेट विरोधी पक्ष नेते असलेल्या फडणवीस यांच्या मलबार येथील सागर बंगल्यावर दाखल झाले . अल्पकाळ दोघांची चर्चा होऊन तडक फडणवीस-शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेले.

या भेटीतच सरकार स्थापनेचा दावा केला असून

सरकारचा आजच शपथविधी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोव्यातून एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करून आजच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी राज भवनाच्या दरबार हॉलमध्ये 7.30 वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Updated : 30 Jun 2022 4:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top