Home > Politics > चांगली कामगिरी नसलेल्या नागपुरातील भाजप नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता

चांगली कामगिरी नसलेल्या नागपुरातील भाजप नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता

चांगली कामगिरी नसलेल्या नागपुरातील भाजप नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता
X

नागपूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याची उपराजधानी नागपूरात भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत चांगली कामगिरी नसलेल्या नागपुरातील भाजप नगरसेवकांना नारळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे नगरसेवकांची झोप उडाली आहे.

साडेचार वर्षात सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक प्रभागात फिरकले देखील नाहीत. भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन ४० ते ५० नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गडकरी-फडणवीसांच्या बैठकीतनंतर भाजपच्या नगरसेवकांची झोप उडाली आहे.

भाजपकडून येऊ घातलेल्या निवडणूकीत 25 ते 30 टक्के उमेदवार बदलले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागपूरमधील भाजप नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 151 पैकी 108 नगरसेवक निवडून आले होते.

काहीच महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Updated : 19 Oct 2021 8:41 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top