Home > Politics > Floor Test : फडणवीस यांनी आभार मानलेले 'अदृश्य; हात कुणाचे?

Floor Test : फडणवीस यांनी आभार मानलेले 'अदृश्य; हात कुणाचे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले.

Floor Test : फडणवीस यांनी आभार मानलेले अदृश्य; हात कुणाचे?
X

एकनाथ शिंदे सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांना १६४ तर महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली होती. पण दुसऱ्या दिवशी झालेल्या विश्वास दर्शक ठरावावेळी शिंदे सरकारने आपली १६४ मतं कायम ठेवली, उलट शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटाला येऊन मिळाल्याने नार्वेकर यांचे मत कमी झाले तरी शिंदे सरकारने आपला १६४ चा आकडा कायम ठेवला.

पण या ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीची ९९ मतं पडली. याचा अर्थ महाविकास आघाडीची ८ मतं कमी झाली आहेत. यावेळी काँग्रेसचे काही आमदार उशिरा आल्याने त्यांना मतदानात सहभाग घेता आला नाही. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी आपल्या अभिनंदनपर भाषणात पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले, त्याचबरोबर या मतदानात अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्यांनाही धन्यवाद असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे सरकारला अप्रत्यक्षपणे कुणीकुणी साथ दिली, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे काही सदस्य मतदानाच्या वेळी उपस्थित नव्हते, अशोक चव्हाण, वडेट्टीवार सभागृहात नव्हते. त्यातच विरोधकांचं संख्याबळ ८ ने कमी झाले, त्यामुळे अदृश्य हातांचा अर्थ काय अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Updated : 4 July 2022 12:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top