Home > Politics > 'घर का भेदी लंका ढाये', प्रणिती शिंदे कडाडल्या

'घर का भेदी लंका ढाये', प्रणिती शिंदे कडाडल्या

घर का भेदी लंका ढाये, प्रणिती शिंदे कडाडल्या
X

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे बंडखोर आमदार घेऊन गुवाहटीमध्ये बसले आहेत.त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याची शक्यता दिसून येत आहे. पण सरकार स्थिर आहे, असा दावा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. "ज्या माणसासाठी एवढं केलं त्याच माणसाने उद्धवजींना दगा दिला, घर का भेदी लंका ढाये असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. त्याचबरोबर सरकार पडणार नाही, महाविकास आघाडी सरकार आपली टर्म पूर्ण करेल असा विश्वासही प्रणिती शिंदेनी व्यक्त केला आहे. सोलापुरातील काँग्रेसकडून 'अग्निपथ योजने'विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रणिती शिंदे पत्रकारांशी बोलत होत्या.

Updated : 25 Jun 2022 2:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top