अजित पवारांच्या गद्दारीविरोधात नारेबाजी का केली नाही? बंडखोर आमदाराचा सवाल
X
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही जोरदार घोषणाबाजी करत बंडखोरांनी खोके घेतल्याचा आरोप केला. त्यावर आता बंडखोर गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धनंजय मुंडे यांना सवाल विचारला आहे. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करून शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही? , असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.
एवढेच नाही तर टीका करताना गायकवाड यांच्या भाषा घसरली आणि "धनंजयची महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आलीय, जो लोकप्रतिनिधी आहे आणि याला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?, . आम्ही गद्दार नसून खुद्दार आहेत, आमाच्यावर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीवाल्यांना नाही.. मुख्यमंत्री पदासाठी आम्हाला पैसे घेण्याची गरज नाही" असे त्यांनी सुनावले. तर महिन्याभरापूर्वी यांची सत्ता असताना शेतकऱ्यांना मदत केली नाही, मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत दिलीय, असा दावाही त्यांनी केला.