बाळासाहेब थोरात यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक
X
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर प्रथमच विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर सोमवारी बहुमत चाचणी पार पडली. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले, हे मी वेळोवेळी सांगितले आहे. तसेच ते 2019 च्या निवडणूकीवेळी मी पुन्हा येईनची घोषणा द्यायचे. त्यावर मी कोल्हापुर येथे बोलताना तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून पुन्हा याल, असं म्हटलं होतं. ते काही अंशी तसंच घडलं. मात्र तुम्ही पुन्हा असं याल असं वाटलं नव्हतं, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
पुढे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याची माहिती दिली. तसंच देशात लोडशेडिंग असताना आम्ही जास्तीत जास्त वेळ वीज देण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली.
त्याबरोबरच महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी जी कामं केली. ती कामं सभागृहासमोर मांडण्यावर बाळासाहेब थोरात यांचा भर होता. त्याबरोबरच बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांचेही कौतूक केले.