विधानसभेत जयंत पाटील देवेंद्र फडणवीस भिडले
X
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवले आहे. तर यावेळी विधानसभेत जयंत पाटील विरुध्द देवेंद्र फडणवीस सामना पहायला मिळाला.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली असून यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, राज्यपालांनी ज्या पध्दतीने सरकार स्थापन करताना तत्परता दाखवली. तेवढीच तत्परता विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या निवडीसंदर्भात दाखवून आदर्श निर्माण करून द्यावा.
जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. "महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत वारंवार विनंती केली होती. पण त्यांनी आमची विनंती कधी मान्य केली नाही. ते कशाची वाट बघत होते, हे आज सर्वांच्या लक्षात आले आहे. हे त्यांनी आधीच सांगितले असते किंवा एकनाथरावजी यांनी हे आधीच केले असते. पण आता राज्यपाल महोदयांनी ही मागणी आता मान्य केली. त्यामुळे त्यांचे आभार मानावेत. राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो, याचे एक उदाहरण आपल्या राज्यपालांनी महाराष्ट्राला आणि देशाला घालून दिले आहे." असा खोचक टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.
पुढे बोलताना जयंत पाटील यांनी राज्यपालांना विनंती केली की, "आम्ही पाठवलेली विधानपरिषदेची १२ नावांची यादी तात्काळ मान्य करावी. ज्यामुळे राज्यपाल सर्वांशी समान वागले, असे दाखविण्याची ही शेवटची संधी आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
विधानसभेत जयंत पाटील देवेंद्र फडणवीस भिडलेजयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांचे आभार मानले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाना पटोले यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पहायला मिळाला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.