Home > Politics > संसदेच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला तयारीचा आढावा…

संसदेच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला तयारीचा आढावा…

संसदेच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला तयारीचा आढावा…
X

कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची संख्या लक्षात घेता संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या दरम्यान आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या स्वच्छतेच्या कामाची आणि तयारीची पाहणी केली.

यावेळी बिर्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला, संसदेत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू आहे. मला आशा आहे की साथीच्या काळात खासदार आणि कर्मचारी सुरक्षित राहतील. ६० वर्षावरील खासदारांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना यावेळी बिर्ला यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बिर्ला यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती माध्यमांना दिली.

तर दुसरीकडे सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोना पार्श्वभूमीवर संसदेतील कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दोन्ही सभागृहांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

Updated : 11 Jan 2022 5:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top