Home > Politics > नव्या वर्षात सगळ्या घोटाळ्यांचे हिशोब करणार, किरीट सोमय्या यांचा इशारा

नव्या वर्षात सगळ्या घोटाळ्यांचे हिशोब करणार, किरीट सोमय्या यांचा इशारा

नव्या वर्षात सगळ्या घोटाळ्यांचे हिशोब करणार, किरीट सोमय्या यांचा इशारा
X

किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वारंवार घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यातच नववर्षाच्या पार्श्वभुमीवर किरीट सोमय्या यांनी उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली होती. तर सरकार बदलल्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए सदनिका लाटल्याचा आरोप केला होता. आता नव्या वर्षानिमीत्त काय संकल्प करणार याबाबत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली.

किरीट सोमय्या म्हणाले, उद्यापासून नवे वर्ष सुरू होत आहे. या नव्या वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए सदनिका याबरोबरच मुंबई महापालिका घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे.

Updated : 31 Dec 2022 10:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top