चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटींचा ठेका- किरीट सोमय्या
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
X
एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा ठेका दिला असल्याचा आरोप आज किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला. तसेच बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली होती त्या कंपनीला मुलाने ठेका दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. आता नंबर कुणाचा, सुजित पाटकर (Sujit Patkar) की संजय राऊत? ( Sanjay Raut) १०० कोटी रुपयांचा कोविड घोटाळा बाहेर आला. मुंबई पोलिसांनी या प्रकणी दोघांना अटक केलं, कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार सापडले. काही आयकर विभाग, काही ईडीने, तर काही मुंबई पोलीसांनी शोधले. संजय राऊत यांचे भागिदार सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीला महापालिकेकडून एकू ३२ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी १४ कोटी ३ लाख २९ हजार ८३९ रुपये एका वेगळ्याच बँक खात्यात पाठवण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी या पत्रकार परिषदेत केला.
या बँक खात्यातून कोणाकोणाला पैसे गेले हा तपास सुरु आहे. आयकर खातं यावर तपास करत आहे. आयकर विभाग, ई.डी. आणि मुंबई पोलीस यावर तपास करत आहेत. एका मेव्हण्याच्या खात्यात लाखो रुपये पाठवले. हा मेव्हणा काही दिवसांनी कळेल, असे सूचक विधान सोमय्या यांनी यावेळी केले. या प्रकरणी ज्यांना अटक झाली त्यात के.ई.एम. रुग्णालयाबाहेरचा चहावाला आहे. त्याच्यावर मे २०२२ मध्ये धाड टाकली होती. असे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा कोविड सेंटरचा ( Covid Centre ) ठेका देण्यात आला. आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thackeray ) तर पुण्यातील पीएमआरडीएने बंदी घातलेल्या एका कंपनीला वरळीतील आयसीयूचा ठेका दिला. पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत तीन कोविड रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे या कंपनीवर बंदी घालण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
मात्र बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली त्याच कंपनीला मुलाने वरळी कोविड सेंटरच्या आयसीयूचा (ICU) ठेका दिला. याशिवाय दहिसर आयसीयूचा ठेकाही याच कंपनीला देण्यात आल्याचे सोमय्यांनी सांगत ठाकरे पिता-पुत्रावर सडकून टीका केली.