Home > Politics > उध्दव ठाकरे यांचा राईट हँड प्रविण कलमे विरुध्द लुकआऊट नोटीस - किरीट सोमय्या

उध्दव ठाकरे यांचा राईट हँड प्रविण कलमे विरुध्द लुकआऊट नोटीस - किरीट सोमय्या

उध्दव ठाकरे यांचा राईट हँड प्रविण कलमे विरुध्द लुकआऊट नोटीस - किरीट सोमय्या
X

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवे सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी मुंबई पोलिसांनी उध्दव ठाकरे यांचे राईट हँड प्रविण कलमे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केले आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मुख्यंमत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर एस आर ए मधून फाईल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रविण कलमे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नॉन बेलेबल वॉरंट जारी केले आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. (Mumbai police send lookout notice to Pravin kalme)

किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, एस आर ए मधून फाईल चोरी केल्याप्रकरणी अर्थ एनजीओचे प्रविण कलमे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर सध्या ते देश सोडून गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नॉन बेलेबल वॉरंट जारी केली आहे.

तसेच प्रविण कलमे हे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे राईट हँड तर जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांचे सचिन वाझे असल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. तसंच एसआरए मधून फाईल चोरी केल्याप्रकरणी अटक करू नये यासाठी तात्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोन केला होता, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. मात्र आता अंत जवळ आला असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.


Updated : 2 July 2022 2:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top