Home > Politics > मुबलक कोळसा साठा असताना, देशात वीजेबाबत घोळ का? KCR गरजले

मुबलक कोळसा साठा असताना, देशात वीजेबाबत घोळ का? KCR गरजले

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मोदी सरकारच्या वीजेच्या धोरणावर सडकून टीका केलीय. काय म्हणालेत ते जाणून घेण्यासाठी वाचा...

मुबलक कोळसा साठा असताना, देशात वीजेबाबत घोळ का? KCR गरजले
X

के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलत देशभर विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच महाराष्ट्रातील नांदेडमध्ये सभा घेऊन केसीआर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केला आहे

यावेळी बोलताना केसीआर म्हणाले, देशात आजघडीला 361 बिलियन टन इतका कोळसा आहे. हा कोळसा देशातील विविध खाणींमध्ये आहे. म्हणजेच हा साठा देशात वीजनिर्मीतीसाठी 125 वर्षे पुरेल. मात्र इतका कोळसा असूनही या देशात शेतकरी आणि सामान्य नागरिकांना वीज का मिळत नाही? अनेक खेडी अंधारात का आहेत? नेमकं यामागे काय गौडबंगाल काय आहे? असा सवाल करीत केसीआर यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले.

तसेच पंतप्रधान मोदी यांचे धोरण हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसल्याचेही केसीआर यांनी नांदेडमध्ये बोलताना सांगितले. यावेळी शेतकरी आणि सर्वसामान्यांना मुबलक वीज देण्याचा विश्वास केसीआर यांनी नांदेड येथील सभेतून दिला.


Updated : 6 Feb 2023 3:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top