Home > Politics > कसबा- चिंचवड पोटनिवडणूकीबाबत प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेला फूस

कसबा- चिंचवड पोटनिवडणूकीबाबत प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेला फूस

कसबा- चिंचवड पोटनिवडणूकीबाबत प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेला फूस
X

शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहूजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडून महाविकास आघाडीबाबत सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची विधाने केली जात आहेत. त्यातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे.

मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर या दोन्हीही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही जागा शिवसेनेने लढवण्याची मागणी केली आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2014 मध्ये कसबा पेठ जागा काँग्रेसने लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र ज्यावेळी सेनेनी ही जागा लढवली होती. त्यावेळी सेनेला 65 हजार मतं मिळाले होते. त्यामुळे सेनेला आम्ही विनंती केली आहे की, तुम्ही दोन्हीही जागा लढा. कारण कसब्याची जागा काँग्रेस कायम हारत आली आहे. मात्र तिथे सेनेचा प्रेसेन्स आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची नाही. त्यामुळे आम्ही सेनेला दोन्ही जागा लढण्याची विनंती केली आहे. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे काय भूमिका घेणार ते पाहूयात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बैठक घेऊन ठरवू, असं म्हटलं जात असतानाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा सहयोगी पक्ष वंचितकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर शिवसेनेला फूस लावत असल्याचं म्हटलं जात आहे.

Updated : 5 Feb 2023 1:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top