कर्नाटक सरकारला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे : अंबादास दानवे आक्रमक
महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील रहिवाशांना ५३ कोटी रुपयांच्या निधी जाहीर केला होता. पण कर्नाटक सरकारने य निधीवर रोख आणल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सभागृहात आक्रमक झाल्याचे दिसून आले. कर्नाटकाने गर्विष्ठता सोडण्याची गरज आहे. अंबादास दानवे यांच्या म्हणण्यानुसार, सीमावर्ती भागातील रहिवाशांचे आरोग्याचा निधी रोखण्यासाठी कर्नाटक सरकारला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे.
X
खरंतर महाराष्ट्र सरकार सीमावर्ती प्रदेशांच्या आरोग्यासाठी दिलेला रोखून ठेवने ही चिंताजनक बाब आहे. आपलं सरकार त्याच ताकदीने कर्नाटक सरकारचा बदला का घेत नाही, असा सवाल दानवे यांनी केला. कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आहेत.
दानवे म्हणाले की, केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असताना आमच्या सरकारने सीमावर्ती भागातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी निधी रोखून ठेवणे हे मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून अयोग्य आहे. कर्नाटक सरकारने निधी रोखण्याची घोषणा करून चार दिवस उलटले आहे तरी अजूनही सरकार गप्प का ? सरकारला धारेवर धरत दानवे यांनी सवाल केला.
महाराष्ट्राच्या जनतेने, विधिमंडळ व सरकारने यासाठी एकत्र आलं पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री व तेथील नेते ज्याप्रमाणे एकत्र येऊन आक्रमक भूमिका मांडतात त्याप्रमाणे सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली.