Karnataka Crisis : महाराष्ट्राविरोधात भूमिका घेणाऱ्या बोम्मईंचं मुख्यमंत्री जाणार?
X
महाराष्ट्राविरोधात सातत्याने गरळ ओकणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे बसवराज बोम्मई यांचे मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे.
2023 मध्ये कर्नाटकसह देशभरातील नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर कर्नाटक भाजपच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच महाराष्ट्राविरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या बसवराज बोम्मई यांचे मुख्यमंत्री पद जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी कारणही अगदी तसंच आहे.
2023 मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीपुर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस येडियुरेप्पा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे आगामी काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची गच्छंती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकार विशेष कामगिरी करू शकले नाही. त्यातच बोम्मई सरकारमधील अनेक मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर विरोधक बोम्मई यांच्यावर pay CM अशी टीका करीत आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व बोम्मई यांच्यावर नाराज आहे. आगामी काळातील निवडणूका येडियुरेप्पा यांच्या नेतृत्वात लढवण्यास पक्ष नेतृत्वाचा कल आहे. त्यामुळे बोम्मई यांच्याकडील मुख्यमंत्री पद जाऊन येडियुरेप्पा यांना ते दिले जाईल. त्यासाठीच भाजपने येडियुरेप्पा यांचा केंद्रीय संसदीय मंडळात समावेश केला आहे. त्यामुळे येडियुरेप्पा यांना मुख्यमंत्रीपद देऊन कर्नाटकमध्ये निवडणूका लढवण्याचा भाजपचा विचार असल्याचे म्हटले आहे.