Home > Politics > Karnataka CM : सिद्धरामय्या की शिवकुमार? घोषणेची तारीख ठरली !

Karnataka CM : सिद्धरामय्या की शिवकुमार? घोषणेची तारीख ठरली !

Karnataka CM Decision Live Update : कर्नाटकमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार? आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Karnataka CM : सिद्धरामय्या की शिवकुमार? घोषणेची तारीख ठरली !
X

Karnatak CM : कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत 135 जागा जिंकल्या. त्यामुळे हाती स्पष्ट बहूमत असल्याने काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांची चाचपणी सुरु केली. मात्र कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया ( DK Shivkumar Vs Siddarmaiah) यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यातच सिध्दारमैया यांचा अहिंदा (AHINDA) फॅक्टर मजबूत आहे. यामध्ये SC, ST, मुस्लिम या समुदायाचा समावेश आहे. त्याबरोबरच कर्नाटकमधील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या कुरुबा समुदायातून येत आहेत. तसेच सिध्दारमैया 76 वर्षांचे आहेत. त्याबरोबरच ते मल्लिकार्जून खर्गे आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे सिध्दारमैया यांची मुख्यमंत्री बनण्याची जास्त शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

डी के शिवकुमार यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कर्नाटकमध्ये आक्रमकपणे प्रचार केला. त्यामुळे सध्या काँग्रेसला मिळालेल्या यशात डी के शिवकुमार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदावर दावा आहे. यापार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण? डी के शिवकुमार की सिध्दारमैया? यावर मल्लिकार्जून खर्गे घोषणा करणार आहेत.

मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राहुल गांधी यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर सिध्दारमैया यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र डी के शिवकुमार यांनी तब्बेतीचे कारण देत दिल्लीला जाणे टाळले आहे. दुसरीकडे मी काँग्रेसच्या हायकमांडचा भाग नाही. मी कार्यकर्ता आहे. जनतेचा कौल आम्हाला मिळाला आहे. आमच्याकडे 135 चं संख्याबळ आहे. ते संख्याबळ काँग्रेसचं आहे. शिवकुमारचं नाही. पण मला संधी देण्याची मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र अंतिम निर्णय हायकमांड घेईल. त्यामुळे वफादारीच्या बदल्यात वफादारी मिळेल, असं म्हणत डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना वक्तव्य केलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसचं हायकमांड म्हणजे राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याशी चर्चा करून उद्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे मुख्यमंत्री पदाची घोषणा करणार आहेत. मात्र यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ ही सिध्दारमैया यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती मॅक्स महाराष्ट्रच्या विशेष सुत्रांनी दिली आहे.


Updated : 16 May 2023 10:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top