Home > Politics > कपिल सिबल यांचा 'इन्साफ मंच' ; उध्दव ठाकरेंचा पाठींबा

कपिल सिबल यांचा 'इन्साफ मंच' ; उध्दव ठाकरेंचा पाठींबा

ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल (Kapil Sibbal) यांनी देशातील अन्यायाचा सामना करण्यासाठी इन्साफ (Insaf) या मंचाची स्थापना करण्याची घोषणा केली असून उध्दव ठाकरेंनी (Udhhav Thakare) लोकशाही वाचवण्यासाठी कपिल सिब्बल यांना पाठींबा देण्याचं आवाहन केलं आहे.

कपिल सिबल यांचा इन्साफ मंच ; उध्दव ठाकरेंचा पाठींबा
X

ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी देशातील अन्यायाचा सामना करण्यासाठी इन्साफ या मंचाची स्थापना करण्याची घोषणा केली. देशातील विरोधी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री यांच्यासह सर्वानी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन सिबल यांनी केले. या मंचातर्फे ११ मार्चला जंतर मंतर येथे सार्वजिक सभा आयोजित केली जाईल असे त्यांनी सांगितले. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अन्याय होत आहे, नागरिक, संस्था, राजकीय विरोधक, पत्रकार, शिक्षक, आणि मध्यम व लघु उद्योगांना अन्यायाचा सामना करावा लागतो असे सिबल म्हणाले. सामान्य लोक आणि वकील एकत्र येऊन अन्यायाविरोधात लढा देतील अशी कल्पना त्यांनी मांडली. भरपूर विचारमंथन करून ‘इन्साफ’ मंच स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. त्यासाठी इन्साफ का सिपाही ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे, त्यावर कोणीही नाव नोंदवू शकतो अशी माहिती सिब्बल यांनी दिली. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली, ईडीचा वापर करून राजकीय विरोधक संपवले जात असल्याचे ते म्हणाले. कपिल सिबल हे नावाजलेले वकील असून अनेक वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. गेल्या वर्षी ते पक्षातून बाहेर पडले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा कपील सिब्बल यांच्या आवाहनाला पूर्ण पाठींबा ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल यांनी न्याय व्यवस्था आणि लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचे केलेलं आवाहन स्वागतार्ह असून आपला यास पूर्ण पाठिंबा आहे . देशात लोकशाही जिवंत राहावी अशी ज्यांची ईच्छा असेल त्या सगळ्यांनी कपील सिब्बल याना समर्थन देणे आवश्यक आहे आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केले आहे .

Updated : 5 March 2023 11:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top