Home > Politics > आप गुड खाये और गुलगुले से परेज करें ऐसा तो हो नहीं सकता- कन्हैय्या कुमार

आप गुड खाये और गुलगुले से परेज करें ऐसा तो हो नहीं सकता- कन्हैय्या कुमार

आप गुड खाये और गुलगुले से परेज करें ऐसा तो हो नहीं सकता-  कन्हैय्या कुमार
X

भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये आहे. दरम्यान या यात्रेच्या सुरुवातीपासूनच भाजपने भारत जोडो यात्रेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याला कन्हैय्या कुमार यांनी पंजाबमध्ये उत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. या यात्रेच्या कालावधीत भाजपने (BJP) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह भारत जोडो यात्रेवर जोरदार टीका केली आहे. या टीकेचे वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये कधी राहुल गांधी यांचा टी-शर्ट (Rahul gandhi T-shirts) तर कधी महिलांची घेतलेली गळाभेट. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्याला काँग्रेसने (Congress) अनेक वेळा प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच आता भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये असताना कन्हैय्या कुमार यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्र सोडले आहे.

कन्हैय्या कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अनेकदा विचारणा केली जाते की, RSS भारत जोडो यात्रेवर टीका करत नाही. मग तुम्ही आरएसएसवर टीका का करता? मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे भाजप आणि आरएसएस एकच आहे. परंतू दोन्ही वेगवेगळे असल्याचे दाखवले जात आहे. कन्हैय्या कुमार म्हणाले, आप गुड खाए और गुलगुले से परेज करें, ऐसा तो हो नहीं सकता, असा टोला कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी भाजपला लगावला आहे.

Updated : 16 Jan 2023 4:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top