जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार ?
X
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी सहा वाजता ट्विट करत आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय. हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्य दृश्य असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ठाणे येथे चित्रपट बंद पाडला होता, यावेळी कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना बेदम मारहाण करण्यात आली होती, तसे व्हिडीओ ही व्हायरल झाले होते. याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती , त्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांना जामीन दिला होता.
काय म्हटलंय आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात दोन खोटे गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ मी ह्या पोलिसी अत्याचारविरुद्ध लढणार मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे.लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही